Sau. Anita Jagtap
असं म्हणतात की कुठल्याही प्रवासाची सुरुवात ही एका पावलानेच करायची असते, मग नवोदय अभ्यासासाठी ‘पैठणे क्लासेस‘ हे एक यशस्वी पाऊल असे ठरू शकते. क्लास सुरू होऊन दीड महिना उलटला होता तेव्हा माझी कन्या शरयुचा प्रवेश झाला पण तिच्या या पूर्ण क्लासेस मध्ये ती कुठे मागे राहिल्याचं मला तरी आठवत नाही, आणि मागे असली तरी त्या विद्यार्थ्यांना सर्व समवेत कसे आणता येईल याचा विचार पैठणे क्लासेस नेहमी अग्रस्थानी ठेवतो. माझ्या मुलीला गणित विषयात येणारी अडचण, तसेच विषयात येणाऱ्या शंका या सर्वांकडे अगदी बारकाईनं लक्ष देऊन सर व मॅडम यांनी सराव करून घेत अभ्यास रिव्हजनसह पूर्ण करून घेतला त्यामुळे त्यांचे मनापासुन धन्यवाद. त्यामुळे अगदीच विशेष प्राविण्य नाही पण आपल्या पाल्याला यशाकडे वाटचाल करतांना पहायची असेल तर त्या साठी मी एक पालक म्हणून पैठणे क्लासेस सजेस्ट करेन, अंधार हा मुळातच असतो गरज असते ती प्रकाशाची तेव्हा आपल्या पाल्याला नवोदय परीक्षेसाठी तयार करायचे असेल तर या प्रकाशाचा (पैठणे क्लासेसचा) विचार करायला हरकत नाही
~ सौ. अनिता जगताप
Shri. Anil Vadaje
माझे नाव अनिल वडजे व माझी मुलगी वैष्णवी हिच्यासाठी मी नवोदयचे क्लास शोधत असतांना माझे मित्र सुरेश वर्मा यांनी पैठणे क्लासेसचे नाव सांगितले व लगेचच सरांना फोन लावुन ऍडमिशन करायला सांगितले. पैठणे सर व मॅडम स्वतः लक्ष देत सहज व सोप्प्या पद्धतीने शिकवतात. माझ्या मुलीमध्ये गेल्या काही महिन्यात अभ्यासात भरपुर प्रगती झाली असुन नवोदय च्या सराव परिक्षेत तीला खुप छान मार्क्स मिळालेत. सर्व पैठणे क्लासेस व टिमचे धन्यवाद…!
~श्री. अनिल वडजे
Shree. Vijay Vasasntrao Deore
माझे नाव विजय वसंतराव देवरे रा. कृष्णगाव, माझा मुलगा विराज याचा नवोदय साठी वणीतील पैठणे क्लासेस मध्ये प्रवेश घेतला. एक महिना क्लासला लेट प्रवेश घेतला होता तरी सुद्धा पैठणे सर व स्मिता मॅडम यांनी विराजचे मागचे सर्व टॉपिक्स कव्हर करून अगदी वेळेत सर्व सिलॅबस पुर्ण करून घेत त्यावर दोनदा रिव्हीजन देखिल करून घेतली. क्लासमध्ये वेळोवेळी होणाऱ्या पालक चर्चासत्रांमुळे आम्हा पालकांना पाल्याबद्दल व नवोदय बद्दल सखोल माहिती मिळत होती. त्यामुळे विराजकडुन तयारी करवुन घेणे सोप्पे गेले. त्याला सराव परिक्षेत अतिशय चांगले मार्क मिळत असल्याने पैठणे क्लासेस बद्दल समाधानी असुन क्लासच्या शिक्षकांबद्दल आभारी आहे.
~विजय वसंतराव देवरे
Sau. Deepali Kiran Gangurde
नमस्कार, मी सौ. दिपावली किरण गांगुर्डे माझा मुलगा चि. संवेद हा मागील वर्षी नवोदय परीक्षेला बसला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याने पैठणे क्लासेसला प्रवेश केला होता. क्लासमध्ये बेसिक्स सह सर्व ऍडव्हान्स कन्सेप्ट समजावून सांगितल्या व सराव करून घेतला. क्लासच्या माध्यमातुन घेतलेले २० सराव पेपरमुळे त्याच्यात खुप ग्रोथ झाली. त्याला येणाऱ्या अडचणींचे श्री. पैठणे सर व मॅडमांनी कायम निरसन केले आणि त्याला अचुक मार्गदर्शन केले. शेवटी २० जानेवारी २०२४ हा परीक्षेचा दिवस उजाडला आणि आम्ही संवेदला घेऊन दिंडोरीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचलो आणि तिथे चक्क पैठणे सरांना बघितले, सर तिथे त्यांच्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सज्ज होते. त्यांनी संवेदची विचारपूस केली आणि शुभेच्छा दिल्या. संवेद परीक्षा देऊन बाहेर आल्यावर सरांनी त्याच्या जवळ येऊन त्याला विचारले की संवेद तुला ९० मार्क मिळतील ना? त्यावर संवेदने उत्तर दिले की, नाही सर, ९५+ मिळतील हा आत्मविश्वास संवेदमध्ये निर्माण करण्याचं काम पैठणे क्लासेसने केले. त्या कष्टाचे फळ म्हणजे ३१ मार्च २०२४ रोजी नवोदय परीक्षेचा निकाल लागला आणि खूप अभिमानाने सांगावेसे वाटते की शहरी भागातून (open merit) संवेद जिल्ह्यात दुसरा आला आणि पुन्हा एकदा त्याच्यामुळे आमची मान गर्वाने उंचावली.. माझ्या मुलाच्या जीवनातील मोठ्या स्पर्धा परीक्षेत आणि यशात त्याच्या कष्टासोबतच पैठणे क्लासेसचा खूप मोठा वाटा आहे.. नंतर पैठणे सरांनी माझ्या मुलाचा यथोचित सत्कार करून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम देखील केले. पैठणे क्लासेसचे पुन्हा पुन्हा मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
~सौ. दिपावली किरण गांगुर्डे
Sau. Snehal Thormise
माझा मुलगा शिवराज थोरमिसे इयत्ता पाचवी मध्ये असताना नवोदय परिक्षा दिली त्या काळात पैठणे क्लासेसच श्री नामदेव सरानी शिवराज कडुन नवोदयाच्या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा खुप जास्त सराव करून घेतला. त्यांनी त्याचा सराव करून घेण्यात खुप मेहनत घेतली आणि त्यांच्या व शिवराजच्या मेहनतीला यश आले. नामेदव सरांनी योग्य रितीने समजावल्यामुळे व एकुण एक उदाहरणाचा व धड्याचा सराव करून घेतल्यामुळे तसेच त्यांच्या शिकवण्याच्या अगदी छान सोप्या पद्धतीमुळे शिवराजला यश आले त्याचे जवाहर नवोदय परिक्षेत निवड झाली.
~सौ. स्नेहल थोरमिसे